पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये वृध्दावस्था आणि भुकेमुळे वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील लाठी वनक्षेत्राच्या नाल्याजवळ वाघिणीचा मृतदेह आढळला. वाघिणीचा मृतदेह पाहताच स्थानिक नागरिकांनी यांची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

'एकच वादा..अजितदादा', मंत्रिमंडळ स्थापण्याआधी समर्थकांची घोषणाबाजी

वाघिणीची शिकार करण्यात आली असल्याचा अंदाज सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनानंतर वृध्दावस्था आणि भुकेमुळे वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसंच दोन ते तीन दिवसांपूर्वीच वाघिणीचा मृत्यू झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. चंद्रपूरातील चिचपल्ली येथील रेस्क्यू सेंटरमध्ये वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोडसा भागामध्ये वाघ मृतावस्थेत आढळला होता. 

शपथविधी सोहळ्यासाठी 'शिवतिर्था'वर जोरदार तयारी