चंद्रपूरमध्ये नदीपात्रात पट्टेदार वाघ अडकला आहे. भद्रावती तालुक्यातील नदीपात्रात हा वाघ अडकला आहे. या वाघाला काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नदीपात्रात वाघ अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता वाघाला पाहण्यासाठी आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.
ठरल्याप्रमाणे करा एवढाच प्रस्ताव - संजय राऊत
भद्रावती तालुक्यातील माजरी गावाजवळ नदीपात्रात पट्टेदार वाघ अडकला आहे. माजरी गावापासून ४ किलो मीटर अंतरावर शिवना नदीत दगडांच्या मधोमध हा वाघ अडकला आहे. या वाघाला बघण्यासाठी नदी पुलावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, भद्रावती शेतशिवारात अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये हा वाघ आला असेल. त्याच दरम्यान तो नदीपात्रात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा वाघ जिवंत आहे की मृत याची खात्री अद्याप झालेली नाही.