पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरच्या वीज केंद्रामध्ये वाघाचे दर्शन!

चंद्रपूर वाघ

चंद्रपूरच्या वीज केंद्रामध्ये वाघाचे दर्शन झाले आहे. वीज केंद्रामध्ये वाघ आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वीज केंद्राच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून जवळ असलेल्या एका नाल्यात वाघ दिसला. या वाघाने एका गायीची शिकार केली होती. 

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा सेवक

चंद्रपूर वीज केंद्रामध्ये दिवसेंदिवस प्राण्याचा वावर वाढत आहे. वीज केंद्रातील कर्मचारी कामावर जात असताना त्यांना सकाळी एका नाल्यात वाघ दिसून आला. गायीची शिकार करुन नाल्यामध्येच त्यावर ताव मारत हा वाघ बसला होता. कर्मचाऱ्यांचा गोंगाट सुरू झाल्यानं विचलित होऊन वाघाने ही शिकार नाल्यालगत झुडपात ओढत नेली.

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

दरम्यान, वाघाच्या दर्शनामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. वीज केंद्रात जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच हा वाघ असल्यामुळे वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाघावर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे. यापूर्वी वीज केंद्रामध्ये अस्वल, बिबट्या दिसले होते. आता वाघ आल्यामुळे कर्मचारी घाबरले आहेत. 

काबूल बॉम्बस्फोटाने हादरले; ७ जण ठार