पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरमध्ये नदीपात्रात अडकलेल्या वाघाचा मृत्यू

चंद्रपूर वाघ

चंद्रपूरमध्ये नदीपात्रामध्ये अडकलेल्या पट्टेदार वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी गावाजवळ शिवना नदीपात्रात बुधवारी सकाळी हा वाघ अडकला होता. नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत अडकलेल्या या वाघाचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या टीमने वाघाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले. 

सत्ता स्थापनेचा तिढा कायम; काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट घेणार

माजरी गावापासून ४ किलो मीटर अंतरावर शिवना नदीत दोन दगडांच्या मधोमध एक वाघ अडकला होता. नदी पुलावरुन उडी मारल्याने वाघ जखमी झाला होता. त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो जायबंदी झाला होता. नदीपुलावरुन जाणाऱ्या ग्रामस्थांनी वन विभागाला ही माहिती दिली होती. वाघाची नदीपात्रातून सुटका करण्यासाठी वन विभागाची टीम आली होती. वाघाला नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या टीमने अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही. 

गृहनिर्माण क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

वाघाला वाचवण्यासाठी वन विभागाच्या टीमने क्रेनचा वापर केला. क्रेनला पिंजरा बांधून तो नदीपात्रात सोडला. कोंबड्या पाहून वाघ पिंजऱ्यात येईल असे त्यांना वाटले. मात्र वाघ जखमी झाल्यामुळे त्याला पिंजऱ्यात येता येत नव्हते. ज्या ठिकाणी वाघ अडकला होता तिथून त्याची सुटका करणे कठिण होते. शेवटी या वाघाने दगडाच्या फटीतून स्वत:ची सुटका केली. पण त्याला चालता येत नसल्याने तो तिथेच बसून राहिला. रात्री अंधार पडल्यामुळे वन विभागाने बचावकार्य थांबवले होते. मात्र सकाळी बचावकार्य सुरु करण्यापूर्वीच वाघाचा मृत्यू झाला. 

'शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच ती गोड बातमी'