पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरात ६ गावठी पिस्तूलांसह तिघांना अटक

कोल्हापूर पोलिसांची कारवाई

गणेशोत्सवाच्या पाराश्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गावठी पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या तिघांची देखील चौकशी सुरु आहे. 

मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश बारगळला

पुणे-बंगळुरू महामार्गावर कणेरीवाडी फाट्यावर पिस्तूल विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे. शुभम शिंदे, आदिनाथ बडेकर, शर्मेश राठोड या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ पिस्तूल, ११ जीवंत काडतूसे आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट

दरम्यान, या आरोपीची कोल्हापूर पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. ही शस्त्र कोणाच्या सांगण्यावरुन कोल्हापूरात आणण्यात आली होती, तसंच कोणाला विकली जाणार होती याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.  

विधानसभा निवडणूक २०१९: ये जो पब्लिक है, यह सब जानती है..