पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीडमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

बीडमध्ये दुचाकीला अपघात

बीडमध्ये दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीड पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. 

... यापेक्षा आणीबाणी बरी, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उद्विग्न

माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील बुखारी शाळेजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांमधील एका तरुणाची ओळख पटली आहे. गणेश श्रीकिसन मिसाळ (३० वर्ष रा. देवळा  जि. परभणी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तर इतर दोघांची ओळख पटलेली नाही. गेवराई तालुक्यातील केकत पांगरी या गावात राहणारे शंकर भोसले आणि अजित भोसले हे दोघे जण जखमी झाले आहे. दोघांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

सरकार स्थापनेमध्ये शिवसेना अडथळा नाही: संजय राऊत