पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागपूरमध्ये एका रात्रीत तिघांची निर्घृण हत्या

शहापूर हत्या प्रकरण

नागपूरमध्ये एका रात्रीत वेगवेगळ्या ठिकाणी तीन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या सेनापती नगर, गोंडवाना चौक आणि केडीके कॉलेजजवळ या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये भितीचे वातावरण आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला

पहिली घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे. केडीके कॉलेजजवळ बुधवारी रात्री इम्रान सय्यद नियाज या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. खरेदी केलेल्या अद्रकचे पैसे मागितल्यामुळे गुंडानी एका भाजी विक्रेत्याला जखमी करत त्याचा मित्र इम्रानची हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर इतर दोन आरोपी फरार आहेत. या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. 

मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान आणि दादर परिसरात जमावबंदी लागू

तर दुसरी घटना नागपूरच्या गोंडवाना चौकात घडली आहे. याठिकाणी एका प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (५० वर्ष) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ऋषी खोसला हे घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि धारधार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तर, तिसरी घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या अतंर्गत येणाऱ्या सेनापती नगरमध्ये घडली आहे. विक्की विजय दहाट या ३२ वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरु केला आहे. 

राज ठाकरेंना चौकशी घेऱ्यात आणणारे कोहिनूर प्रकरण नेमकं काय आहे?