पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्यांनी मोदीची साथ सोडली त्याचा सत्यानाश झालाः मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांनी मोदींची साथ सोडली त्याचा सत्यानाश झाला, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते महाजनादेश यात्रेत बोलत होते. मोदींची साथ सोडणाऱ्याला जनता कधीच माफ नाही करणार, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत जाणार, पण...

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबत आंदोलन उभा करत असलेल्या विरोधकांवर निशाण साधला. ईव्हीएममध्ये फेरफाराचा मुद्दा  त्यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावला. ईव्हीएमला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन केले तर अधिक उत्तम होईल. अनेकवेळा सत्य स्वीकारण्याऐवजी मनाला समजविण्याचा प्रयत्न काही लोक करतात. ईव्हीएमवर दहा वर्षे त्यांनी राज्य केले आहे. केंद्रात, राज्यात, महापालिकांत, जिल्हा परिषदांमध्ये सगळीकडे राज्य केले. आता ईव्हीएमवर आंदोलन करण्याऐवजी ते जनतेत गेले, तर काही ना काही सहानुभूती त्यांना मिळेल, असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल - फडणवीस

सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या पक्षात येण्यास खूप नेते इच्छुक आहे. पण आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. सगळ्यांना आम्ही घेऊ शकत नाही. अजून काही लोक निश्चितपणे येऊ शकतात. येणाऱ्या नेत्यांचे काम, त्यांची पार्श्वभूमी, स्वच्छ प्रतिमा हे सगळे बघूनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.