पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता कळलं असेल- राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारी कर्मचारी, पोलिसांबरोबर कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. देशातील मंदिर, मशिदी, चर्च बंद आहेत. पण रुग्णालये आणि डॉक्टर कार्यरत आहे. या डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आज कळले असेल. त्यांना काय चूक झाली, हे समजले असेल, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. 

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉक्टर किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना मारहाण करणाऱ्यांना समजले असेल. हे सर्व डॉक्टर आपल्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आपण त्यांना मारहाण केली. आज तेच कोरोनाविषाणू विरोधात लढत आहेत. आपल्या जगण्यासाठी ते झटत आहेत, असेही ते म्हणाले. 

पुण्यात सोमवारी तीननंतर रस्त्यावरील वाहतूक बंद, पोलिसांचा निर्णय

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारच्या कार्याचे कौतुक केले आहे. थोडासा उशीर झाला पण राज्य सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. सरकारी कर्मचारी, डॉक्टर आणि पोलिसांचे विशेष कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत धैर्याने ही लोकं जनतेची सेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले. 

सरकार आणि सरकारी यंत्रणा ज्या दिशेने कार्य करत आहे. ते अत्यंत योग्य आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे कोणत्या शब्दांत आभार मानू कळत नाही, असेही ते म्हणाले.

कोरोना : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Those who beaten doctors may know importance of them says mns chief Raj Thackeray on coronavirus covid 19