पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री - नितीन गडकरी

नितीन गडकरी

ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच मुख्यमंत्री होतो. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक १०५ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ते विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, हे सुद्धा स्पष्ट केले.

अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देऊ - सुधीर मुनगंटीवार

नितीन गडकरी म्हणाले, शिवसेनेशी आमची बोलणी सुरू आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, याचा मला विश्वास आहे. ज्यांच्या जास्त जागा त्यांच्याच मुख्यमंत्री होतो. भाजपच्या १०५ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तिढा सोडविण्याशी काहीही संबंध नाही. आमचे निर्णय सर्वस्वी भाजप करीत असतो. भाजपने आपला निर्णय केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार.

तेलंगणातील त्या घटनेमुळे आंध्रतील महिला अधिकाऱ्याने केला हा उपाय

मी आता दिल्लीत केंद्रीय सरकारमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी सांगितले.