पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, फडणवीसांचे वक्तव्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेनेने साद द्यावी भाजपची दारे त्यांच्यासाठी उघडी आहेत, असे वक्तव्य भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. शिवसेना मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री हे समीकरण भविष्यात प्रत्यक्षात येऊ शकेल का असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले. यासाठी शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. 

मते मागताना त्यांनी आमच्या नावावर मते मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा, फोटोचा वापर त्यांनी प्रचारात केला. आम्ही त्यांच्यासोबत मते मागितली होती. चर्चची दारे त्यांनी बंद केली आहेत. त्यांना सर्वांत आधी बोलू द्या मग पाहू.

'नागरिकत्व कायदा लागू करण्यास नकार देण्याचा राज्यांना अधिकार नाही'

याआधी ते आमच्याबरोबर होते. भविष्यातही ते आमच्याजवळ राहतील. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनाच जवळचीच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आमचे ठरलेच नव्हते. मी हे उद्धव ठाकरेंनाही सांगितले होते. अमित शहा यांनीही असे कधीच बोलणे झाले नसल्याचे मला म्हटले होते. त्याचवेळी चर्चा झाली असती. पण त्यांनी माझे फोन उचलणेही बंद केले होते, याचा पुनरुच्चार केला.

मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरुन तरुणीने उडी मारली

अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांनी फोन केला असता तर कदाचित शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेली नसती, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर फडणवीस म्हणाले की, त्यांनी माझा फोन उचलला नाही. मग त्यांनी मोदींचाही फोन उचलला नसता तर, असा उलट सवाल करत आमचा पक्ष काय रस्त्यावर पडला आहे का, असेही त्यांनी म्हटले.