पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर कीर्तन सोडून शेती करेन, इंदुरीकर महाराज व्यथित

इंदुरीकर महाराज

गेल्या चार दिवसांत मला खूप मनस्ताप झाला आहे. मी दोन ते अडीच तास बोलतो. त्यात एखादं वाक्य चुकून जाऊ शकतं. माझी सहन करायची कॅपिसिटी संपली आहे. मी जे काही बोललो ते चुकीचे नाही. हे सर्व आधीच ग्रंथात लिहिले आहे. पण मी आता वेगळ्या निर्णयाप्रत आलो आहे. हे एक-दोन दिवस पाहीन नाही तर मी कीर्तन सोडून शेती करायला घेईन, असे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होत म्हटले. 

उद्या कशाला आत्ताच सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. यावर ते एका कार्यक्रमात बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

ते पुढे म्हणाले, हे युट्यूबवाले आणि कॅमेरेवाले माझ्या मागे लागले आहेत. मी आता वेगळ्या निर्णयाप्रत आलो आहे. माझी सहन करायची कॅपिसिटी संपली आहे. गेल्या २६ वर्षांपासून मी कीर्तन करतो. दोन ते अडीचतास बोलतो. एखादं वाक्य चुकून जाऊ शकतं. 

फोन टॅपिंगच्या चौकशीवरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत दुमत

गेल्या तीन दिवसांत अर्धा किलोनं माझं वजन कमी झालं आहे. आता शेतीच करायची बास. आता काहीच मजा उरलेली नाही. ही सगळी काड्या करणारी मंडळी युट्बवाली आहेत. पण युट्यूबवाले संपतील पण इंदुरीकर महाराज नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.