पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेट खेळत नाही पण त्याचे नियोजन करतो, गडकरींच्या वक्तव्यानंतर पवारांचे सूचक विधान

शरद पवार

क्रिकेट आणि राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले होते. तोच मुद्दा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, मी क्रिकेट खेळत नाही पण त्याचे नियोजन करतो. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी हे विधान केले.

'मोदी, शहांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील'

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी उत्तरे दिली. शरद पवार हे गुरुवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते विविध ठिकाणी बांधावर गेले. त्यानंतर त्यांनी या विषयावरील प्रश्नांना प्राधान्याने उत्तरे दिली. राजकीय विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आमचे मित्रपक्ष आणि शिवसेना यांचे सरकार सत्तेत येईल आणि ते पाच वर्षे टिकेल. राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची अजिबात शक्यता नाही. सध्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासह सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत. पण यामध्ये काहीही अंतिम झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थिर सरकार देण्यावर आमचा भर असल्याचे सांगून ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आकडे नाहीत. आमच्याकडे बहुमताचे आकडे असते तर इतका वेळ चर्चा केलीच नसती. 

'शिवसेनेचा मुख्यमंत्री २५ वर्षे राहिल, पण मी पुन्हा येईन म्हणणार नाही'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांशी संवाद साधताना सांगितले की राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल. दुसरे कोणतेही सरकार आले तर ते फार काळ टिकणार नाही. या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी मला फक्त मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... हेच वाक्य अजून आठवते आहे, असा टोला लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The process to form government has begun the government will run for full 5 years says sharad pawar