पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM मध्ये नाही, तर निवडणूक अधिकाऱ्याकडील मशीनमध्ये गडबड - शरद पवार

शरद पवार

मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन जिथे मत देतात, त्या ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात EVM किंवा व्हीव्हीपॅट VVPAT यंत्रात कोणतीही गडबड नाही. पण निवडणूक अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि दिल्लीत विरोधकांशी चर्चा करून आम्ही या विषयाच्या खोलात जाणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. एएनआयने हे ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जी मतदान प्रक्रिया राबविली जाते, त्यावर शंका उपस्थित केली. याआधीही शरद पवार यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते. 

१२३ भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी CVC परवानगीच्या प्रतीक्षेत

शरद पवार म्हणाले, आपण ज्यांना मत देत आहोत, ते प्रत्यक्षात त्यांना जातच नसल्याचे लक्षात आल्यावर लोक सध्या शांत राहतील. पण भविष्यात ते नक्कीच कायदा हातात घेतील. आपण तसे होऊ दिले नाही पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

हा तर लोकशाहीवरील हल्ला
बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देणे हा तर लोकशाहीवरील हल्ला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मालेगाव स्फोटात ज्या महिलेवर गंभीर आरोप आहेत. तिला लोकसभेच्या निवडणुकीचे तिकीट देणे हा तर लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रकार असल्याचे शरद पवार म्हणाले. 

भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The problem is not the with the EVM or VVPAT but with the machine with electoral officer sharad pawar