पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ढोबळी मिरचीला दर नाही, शेतकऱ्यानं पीक केलं उद्ध्वस्त

दर न मिळाल्यानं शेतकऱ्यानंच ढोबळी मिरचीचं पीक केलं उद्ध्वस्त

पाणी नसतानाही मोठ्या कष्टाने घाम गाळून पिकवलेल्या ढोबळी मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील पापरी (मोहोळ) परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. गुंतवलेले भांडवलही निघत नसल्याने येथील ढोबळी मिरची उत्पादक शेतकरी आपले सर्व पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. आधीच पाऊस नसल्याने पिचलेल्या या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने दुहेरी फटका बसत आहे. या परिसरातील शेतकरी आपले विक्री योग्य पीक उपटून बांधावर फेकून देत आहेत. उपटून फेकलेल्या पिकावर ते आपली दुभती जनावरे चरण्यासाठी सोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

पापरी येथील तरुण शेतकरी मारुती गजेंद्र माळी यांनी आपली एक एकर क्षेत्रावरील ढोबळी मिरचीची रोपे उपटून बांधावर फेकून दिली असून त्यामुळे सुमारे ४ ते ५ टन माल मातीमोल होत आहे.

सांगलीत एसटी बस पलटी होऊन ३८ विद्यार्थी जखमी

या संदर्भात शेतकरी माळी म्हणाले की, पाऊस नसल्याने शेतातील विहिरीची व बोअरची पाणी पातळी खालावली आहे. दररोज अर्धा ते पाऊणतास बोअरमधील विद्युतपंप चालतो. या उपलब्ध पाण्याचे ठिबकवर नियोजन करत जून महिन्यात एक एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवड केली होती. त्यास रासायनिक खतांच्या मात्रा देत, फवारण्या करत चांगले पीकही आणले होते. रोपे मिरचीने लगडली होती. मिरची विक्रीयोग्य होइपर्यंत माझा सुमारे ७५ ते ८० हजार रुपये खर्च झाला आहे. मागील आठवड्यापासून याची दोनवेळा तोडणी झाली. मिरचीचा तोडा घरच्या व बाहेरील महिलांकडून करतो. तोड़ा केलेल्या मिरचीच्या १५ किलोच्या पिशवीत भरून त्या पंढरपूर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या बाजारपेठांमध्ये विक्रीस पाठवतो. गेल्या आठवड्यात मी १५ किलोच्या ७६ पिशव्या पंढरपूर बाजारात पाठवल्या होत्या. १५ किलोंची एक पिशवी १५ रूपयांनाच विकली गेली. गेल्या काही दिवसांपासून ढोबळी मिरचीचे बाजारभाव एकदम उतरले आहेत. सध्या पुणे, कोल्हापूर, वाशी बाजारपेठेत उत्तम प्रतीच्या मिरचीस १२ ते १४ रु प्रति किलो दर प्राप्त होत आहे.  

...म्हणून आमदार नरहरी झिरवाळ यांनी रात्रभर केले ठिय्या आंदोलन

तोडा केलेल्या महिला मजुरांना पदरमोड करून रोजगार दिला. बाजारपेठेत पाठविलेल्या मालाच्या खरेदीस ग्राहक, व्यापारीच जास्त येत नसल्याने त्याचा उठाव होत नाही. तसेच आवक ही जास्त असल्याचे आडत व्यापारी सांगत असल्याने या पुढील काळातही भाव वाढण्याची शाश्वती नसल्याने मी हे पीक त्यावर लागलेल्या मालासह उपटून शेताबाहेर बांधावर फेकून दिले असून त्यावर गाई, म्हशी चरण्यासाठी सोडत आहोत. 

शेतकरी दुष्काळात उपलब्ध पाण्याचे नियोजन करत कमी वेळेत कमी पाण्यात निघणारी पिके घेत दुष्काळाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यातही बाजारभावाची अशी संकटे येत असल्याने त्याला पिकाचा तोड़ा करणेही परवडेना झाल्याने तो मालासह पिके उपटून शेताच्या बांधावर फेकून देत आहेत.

सरकार नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात फेरविचार करेल : मुख्यमंत्री