पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चालकाच्या सतर्कतेमुळे देवगिरी एक्स्प्रेसचा अपघात टळला

देवगिरी एक्स्प्रेस

देवगिरी एक्सप्रेसचा अपघात रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आज (शुक्रवार)टळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पहाटेच्या सुमारास कसारा घाटात इगतपुरी जवळ दरड कोसळली. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र चालकाला वेळीच ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने प्रसंगावधानता दाखवल्यामुळे अपघात टळला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

रेल्वेतील चोरट्यांचा दोन आमदारांच्या पैशांवर डल्ला

नाशिकहून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस बोगद्याजवळ येताच रेल्वेरुळावर दरड कोसळत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने त्वरीत रेल्वे थांबवल्याने मोठा अपघात टळला. या घटनेची माहिती चालकाने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी आणि रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रुळावर पडलेली दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

डोंबिवलीजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू