पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिक्षक- गावकऱ्यांनी केवळ ५० रुपयांत बांधला पूल

प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद जिल्ह्यातील निम चौकी खोरे गावातील शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पूल बांधला आहे. अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या अजिंठा- सातमाळा डोंगररांगेत वसलेल्या या गावात २००१ साली प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत फार दूरुन विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास १५ आहे. 

मात्र पावसाळ्यात नदीला पाणी भरतं, पाण्याची पातळी वाढते,  काहीवेळा मुलं नदीही ओलांडतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका असतो, अशी माहिती शिक्षकांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

तृतीयपंथी मतदार नोंदणीमध्ये मुंबई उपनगर आघाडीवर

'पावसाळ्यात अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे शाळा सुरु ठेवण्यास अडचणी येतात. याचदरम्यान आम्ही औरंगबाद जिल्हा परिषदेच्या एका कार्यशाळेत  सहभागी झालो होतो. याचवेळी पूल बांधण्याची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याचं ठरवलं', अशी माहिती शिक्षक दत्ता देओरे यांनी दिली. 

'मी आणि माझे सहकारी संघपाला इंगळे यांनी पालकांपुढे ही संकल्पना मांडली. पालक, गावकरी मदतीलाही तयार झाले. गावातून आम्ही बांबू गोळा केले. तारा विकत घेतल्या आणि आठवड्याभरात आम्ही पूल बांधला. हा पूल बांधायला आम्हाला केवळ ५० रुपये खर्च आला. ही फक्त तारांची किंमत होती', अशी माहितीही देओरे यांनी दिली.

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मागे

'नदी ओलांडताना आमची पुस्तकं वाहून जायची, गणवेश भिजायचा मात्र आता आमची चिंता मिटली आहे', असा आनंद या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं व्यक्त केला आहे.