पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टॅक्सी-रिक्षाला परवानगी मिळेल, पण...

संचारबंदीच्या काळात  टॅक्सी-रिक्षावर निर्बंध लादण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणावर आळा घालण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना बंदी असेल. कोणीही विनाकारण खासगी वाहनांने फिरु नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना विषाणू : राहुल गांधींनी पंतप्रधानांना विचारले दोन प्रश्न

अत्यावश्यक काम असेल त्यावेळी विशेष खबरदारी घेणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षासाठी मुभा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. टॅक्सीमध्ये चालक अधिक २ तर  रिक्षामध्ये चालक अधिक १ अशी परवानगी देण्यात येईल. पण त्यासाठी कारणही योग्य असायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी  गर्दी टाळावी, असे आवाहन सुरुवातीपासून राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाऊ नये, यासाठी कठोर निर्णय देखील घेण्यात येत आहेत. राज्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्या आले आहेत. यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर निर्बंध येणार आहेत. 

मोठा निर्णय : बुधवारपासून देशांतर्गत विमान उड्डाणे बंद

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा आणि कृषीविषयीच्या गोष्टींवर कोणतीही मर्यादा येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जमावबंदीनंतही लोक बाहेर पडत असल्यामुळे संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Taxi Auto Rickshaw passenger Limit in curfew in maharashtra says cm uddhav thnckeray imposed