पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड

खरीप पीक विमा योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्याला वगळण्यात आले म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात तोडफोड केली आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. तोडफोड केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधून तेथून काढता पाय घेतला. पोलिसांनी नंतर या कार्यकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. 

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. याची भरपाई मिळावी यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांना कृषी अधीक्षकांना निवेदन द्यायचे होते. पण कृषी अधीक्षक रजेवर होते. या कार्यकर्त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना भेटायचे असल्याचे सांगितले. पण आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे या कार्यकर्त्यांनी माध्यमांना संगितले. 

VIDEO:जेव्हा तुझा बाप..,सीएएवरुन जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त

त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. खरीप पीक विमा योजनेतून काही जिल्ह्यांना वगळण्यात आले. त्यात उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्याचा समावेश नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

श्रीमंत देशांना त्यांचा कचरा मलेशियानं पाठवला परत