पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यार्‍या पुजा मोरेंना उस्मानाबादेत अटक

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यार्‍या पुजा मोरेंना उस्मानाबादेत अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान काळे झेंडे दाखवून घोषणा देणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांना उस्मानाबाद पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्या औरंगाबाद येथे होणार्‍या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीसाठी येथे आल्या होत्या. सरकार शेतकर्‍यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप त्यांनी अटकेदरम्यान केला.

अखेर 'वंचित'मध्ये फूट, एमआयएमचा स्वबळाचा नारा

तत्पूर्वी, त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या दुसर्‍या टप्प्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान सिल्लोड तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते. 

सांगलीत नगरसेवकांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी

तेव्हापासून मोरे यांच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्नात होते. मात्र त्या भूमिगत झाल्याने त्या पोलिसांना सापडत नव्हत्या. त्यानंतर शुक्रवारी मोरे या माध्यमांसमोर आक्रोश मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आल्या असता त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांनी हा शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली.

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:swabhimani shetkari sanghtana worker pooja more arrested by osmanabad police for showing black flag to cm fadnavis