पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या! अन्यथा तीव्र आंदोलन करु : राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना राजू शेट्टी

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई त्यांना तात्काळ देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तुळजापूर  तालुक्यातील सिंदफळ, माळूब्रा, आपसिंगा, कात्री, कामठा गावातील नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे.  

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज

राजू शेट्टी यांनी थेट अनेक गावातील शेतात जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. केळी, द्राक्षे, सोयाबीन, कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सरकारने  लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि विमा कंपन्यांनी तात्काळ सरसकट विमा द्यावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शेतकऱ्याला वेठिस धरल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी सरकारला यावेळी दिला.

आता रडायचं नाही तर लढायचं; उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात तिढा निर्माण झाला आहे. काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत जाहीर केली असून यासंदर्भात अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यात आता राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळायची असेल तर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरात लवकर सुटणेही गरजेचे आहे.