पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरकुल घोटाळाः सुरेश जैन, देवकरांसह सर्व ४८ आरोपी दोषी

सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना दोषी जाहीर केले आहे. न्यायालयाने निकाल देताच जैन, देवकर यांच्यासह सर्वच ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी अडीचनंतर सर्व दोषींची शिक्षा जाहीर केली जाणार आहे. 

विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे असेल, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

या खटल्यात सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ५२ आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व ४८ संशयित आरोपी हजर होते. 

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

घरकुल योजना जळगाव नगरपालिकेची होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली होती. या योजनेतील घोटाळा वर्ष २००१ मध्ये समोर आला.