पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेसाठी सुप्रिया सुळेंची राज्यभर 'संवाद यात्रा'

सुप्रिया सुळे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 'महाजनादेश यात्रा' सुरु केली. शिवसेनेने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'जनआशिर्वाद यात्रा' सुरु केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली 'शिवस्वराज्य यात्रा' सुरू केली. तरी सुध्दा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील राज्यभरामध्ये 'संवाद यात्रा' सुरु करणार आहे. आजपासून सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. 

चिदंबरम यांच्या जामीन याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून त्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेतृत्व म्हणून देखील ओळखल्या जातात. आगामी विधासभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे २३ ऑगस्टपासून राज्यभरामध्ये संवाद यात्रा सुरु करणार आहे. या संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात अहमदनर जिल्ह्यातून होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुप्रिया सुळे राज्यातील ६ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. 

'कितीही चौकशा होऊ द्या, पण मी तोंड बंद ठेवणार नाही'

पहिल्या टप्यात २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत अहमदनगर, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव आणि नागपूर या भागातील जनतेशी ते संवाद साधणार आहेत. या संवाद यात्रे दरम्यान सुप्रिया सुळे समाजातील सर्व घटकाशी, विद्यार्थ्यांशी, नोकरदार वर्ग, महिला, शेतकरी, पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे. सध्या राज्यामध्ये असलेली दुष्काळ परिस्थिती, बेजोरगारी आणि पूरपरिस्थिती यांसारख्या वेवगेळ्या विषयांवर ते संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. 

डीएसकेंच्या १३ अलिशान गाड्यांचा होणार लिलाव