पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच अडवाणींची भेट घेणार : उद्धव ठाकरे

मनोहर जोशी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

न्याय देवतेने हिंदूंच्या भावनेला न्याय दिला, अशा शब्दांत शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामजन्मभूमीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक वर्षांपासून राम होते याबाबतच्या आपण कथा ऐकत होतो. त्यांचा जन्म कोठे झाला यावरुन वाद होते. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत हा वाद संपवला आहे. न्यायालयाला मी दंडवत करतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.   

रामजन्मभूमीच्या निकालाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहू नका : फडणवीस

ते पुढे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल जगभरातील हिंदूसाठी आनंदाचा क्षण आहे. यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अशोक सिंघल, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दिग्गजांच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला. लोक हिंदू आहे हे बोलायला घाबरायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी ही भीती दूर केली. आपण एकजूट राहिलो तर एक दिवस हिंदुस्थान महाशक्ती बनेल, असा उल्लेखही त्यांनी केला. 

ऐतिहासिक निर्णय! अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची-सुप्रीम

मागील वर्षी २४ नोव्हेंबरला अयोध्याला जाऊन शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती केल्याचा दाखला देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महारांजाची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी आणि रामजन्मभूमी असलेल्या अयोध्यामध्ये कनेक्शन असल्याचेही त्यांनी म्हटले. गेल्या वर्षी मी ज्यावेळी अयोध्येला गेलो त्यावेळी शिवनेरीची माती घेऊन गेलो होतो. या मातीमध्ये चमत्कार घडवण्याची ताकद आहे. एका वर्षाच्या आत निकाल येणे हे त्याचे फलित असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  

बाळासाहेब असायला हवे होतेः राज ठाकरे

देशातील सर्व धर्मातील लोकांनी या निकालाचे स्वागत केले आहे. या दिवसांसाठी का लोकांनी बलिदान दिले त्यांनाही मी वंदन करतो. या वेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेचाही दाखला दिला. लवकरच त्यांची भेट घेणार असून पुन्हा पुन्हा जावे अशा अयोध्याला पुन्हा एकदा भेट देणार असल्याचेही सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: supreme court historic verdict on the babri masjid ram temple title dispute uddhav thackeray says i meet lal krishna advani