पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामजन्मभूमीच्या निकालाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहू नका : फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामजन्मभूमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे कार्यवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई आणि राज्यातील कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे ते म्हणाले. अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    

अयोध्या प्रकरण: हा कुणाचा विजय किंवा पराभव नव्हे - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटचा दाखला देत ते म्हणाले की, हा कोणाचा विजय किंवा पराजय नाही. हा निकाल देशाच्या अस्मितेचे प्रतिक असणारी अस्था मजबूत करणारा आहे. निकालाकडे वेगवेगळ्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उत्तम वातावरण पाहायला मिळत आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.  

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालातील पाच महत्त्वाची निरीक्षणे

राज्यातील जनता शांतता कायम राखत येणारे सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. या निकालानंतर भारतभक्तीची भावना निर्माण झाली आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास या नाऱ्याने देशात एकजूटीचे वातावरण असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: supreme court historic verdict on the babri masjid ram temple title dispute cm devendra fadnavis press conference in mumbai