पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'

सुधीर मुनगंटीवार

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला गुरुवारी अनेक भागांमध्ये हिंसक वळण आले आहे. या आंदोलनावरुन भापचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते. मग बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांना का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते. 

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार

दरम्यान, 'बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ज्या लोकांवर अत्याचार झाला आहे त्यांना भारतात नागरिकत्व दिले जाणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. जर एकाही भारतीयाचे नागरिकत्व धोक्यात आले तर पहिला राजीनामा मी देईन', असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तसंच, आजपर्यंत त्यांनी फक्त मतांसाठी लाचारी केली असल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. काही नेते स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत असल्याचे देखील मुनगंटीवार यांनी सांगितले. 

उन्नाव बलात्कारः भाजपचा निलंबित आमदार सेंगरला जन्मठेप

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरु आहे. गुरुवारी या कायद्याविरोधात मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आले. तर अहमदनगर येथे झालेल्या आंदोलना दरम्यान आंदोलनकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर आज हिंगोलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. या बंद दरम्यान ३ एसटी बसची तोडफोड करण्यात आली यामध्ये दोन जण जखमी झाले.  

अमेरिकन खासदारांबरोबर बैठक रद्द का झाली?, जयशंकर