पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विद्यार्थ्यांचे 'वर्क फ्रॉम होम'; पक्षांसाठी घरटी, पाण्याची केली सोय

विद्यार्थी पक्षांना घरटी बनविणे व पक्षांना चारा, पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशा गोष्टी करत आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने काळजी घेतली आहे. बहुतांश ठिकाणी 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरुन काम केले जात आहे. त्याचबरोबर काहींच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही सुट्ट्या लागल्या आहेत. आता हे विद्यार्थीही आपापल्या पद्धतीने 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. मुले आपल्या घरी बसून अभ्यासाबरोबर चित्रकला , कार्यानुभव, पक्षांना घरटी बनविणे व पक्षांना चारा, पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशा गोष्टी करत आहेत.    

गर्दी करु नका नाहीतर कठोर पावलं उचलावी लागतील, ठाकरेंचा इशारा

उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला असून दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. मानवाप्रमानेच पक्षांना देखील तहान लागते हे ओळखून सोलापूर जिल्ह्यातील पापरी, पेनूर, खंडाळी (ता. मोहोळ) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मिळालेल्या सुट्टीत अभ्यासाबरोबरच पक्षांसाठी रिकामे ड्रम, पाईप, फेव्हिकॉल, रंग, कागद, वह्यांचे पुष्टे आदि साहित्यांपासून कृत्रिम घरटी बनवित आहेत. तसेच पक्षांना पाणी पिण्यासाठी मडक्यांना रंग देऊन ती मड़की पाणी भरून झाडाला बांधत आहेत.

'जीवावर उदार होत मेहनत घेणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा अभिमान'

कार्यानुभवाचा उपयोग पक्षांसाठी
मी सैनिक स्कूल सातारा येथे इयत्ता सहावीत शिकत आहे. मी घरी आल्यापासून बाहेर न जाता घरीच बसून अभ्यासासोबत चित्रकला, कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून पक्षांसाठी कृत्रिम घरटी बनविली आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मड़की रंगवून ती झाडांना लटकवली आहेत. माझ्या सोबत भाऊ प्रतीक व बहीण ऐश्वर्या हे देखील या कामी मदत करत आहेत.
- प्रज्वल गवळी, (विद्यार्थी, पेनूर)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:student work from home making nest for birds water facility due to coronavirus covid 19 in papri solapur