पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॅगिंगला कंटाळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

गणेश म्हेत्रेने केली आत्महत्या

बीडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. बीड तालुक्यातील नाळवंडी गावात ही घटना घडली आहे. गणेश कैलाश म्हेत्रे असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. महाविद्यालयातील वरिष्ठांकडून वारंवार होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून गणेशने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

गणेश म्हेत्रे लातूर जिल्ह्यातील उदगीर मधल्या धनवंतरी आयुर्वेदिक महावि्दयालयात प्रथम वर्षात शिकत होता. 'तू खेड्यातून आला आहे, तू काय डॉक्टर होणार', असे त्याचे वरिष्ठ त्याला सतत बोलायचे.  महाविद्यालयातील वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची तक्रार गणेशने केली होती. तसंच त्याने कुटुंबियांना देखील याची माहिती दिली होती. गणेशच्या वडिलांनी महाविद्यालयात जाऊन शिक्षकांना याबाबत सांगितले देखिल होते. 

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

दरम्यान, यासर्व त्रासाला कंटाळून गणेश दोन दिवसांपूर्वी गावी निघून आला होता. शुक्रवारी शेतात जाऊन त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी पहाटे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सततच्या रॅगिंगच्या त्रासालाच कंटाळून गणेशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.   

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार