पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेट खेळण्यावरुन कोल्हापुरात दोन गटांत दगडफेक, पोलिस जखमी

कोल्हापूर (प्रतिकात्मक छायाचित्र)

लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौक परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत तुफान दगडफेक, मारामारी झाली. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यात पोलिस अधिकाऱ्यांसह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. महाराणा प्रताप चौक परिसरात दगड-विटांचा खच पडला होता. 

श्रीलंका दंगल: चार शहरात कर्फ्यू, सोशल मीडियावर बंदी

हा प्रकार कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात घडला. मंगळवारी सकाळी लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला होता. त्याचे पडसाद सायंकाळी पाहायला मिळाले होते. लक्ष्मीपुरी पोलिसांना दगडफेकीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली. यात पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेत आणखी सहाजण जखमी झाले आहेत. यावेळी जमावाने परिसरातील वाहनांची मोडतोड केली. त्यात चार वाहनांचे नुकसान झाले.

'शीख दंगलीतील एकाला फाशीपर्यंत पोहचवले, इतरांनाही शिक्षा होईल'