पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप-शिवसेना युतीच्या काळात राज्यात १४५९१ शेतकऱ्यांची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

महाराष्ट्रात ऑक्टोबर २०१४ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत १४५९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याचवेळी गेल्यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये अमरावती आणि नागपूर या दोन महसुली विभागांमध्ये १२८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. महाराष्ट्रात या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर होते.

कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे समोर आला नवा धोका

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१४ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत राज्यात एकूण १४५९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यापैकी ५४३० प्रकरणे कोणत्याही मदतीसाठी पात्र ठरलेली नाहीत. त्याचवेळी २१४ प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. 

महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, अशा सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने विशेष पॅकेज दिले आहे. विशेष म्हणजे राज्यात गेल्यावर्षाच्या अखेरिस सत्ता कोण स्थापन करणार यावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यावेळी डिसेंबरमध्ये राज्यात २४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या काळात १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. 

हॉटेलमध्ये फोन करून महिलांना त्रास देणाऱ्या पुणेकर आरोपीला अटक

राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०१९ मध्ये दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी टप्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहे.