राज्यातील विविध भागातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पूरग्रस्त भागातील परिस्थितीती पूर्ववत करण्यासाठी केंद्राकडून ६ हजार ८०० कोटींची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्राकडून मदत मागणीसाठी दोन भागात प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी ४ हजार ७०० कोटी तर कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी २ हजार १०५ कोटींची मदत मिळावी, अशी मागणी केंद्राकडे करण्यात येणार आहे.
महापूराच्या तडाख्या पडझड झालेली घरे उभारण्याचे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिले आहे. पूरामुळे रस्ते वाहतूकीची अवस्थाही बिकट झाली आहे. यासाठी जवळपास ५७६ कोटींची तरतूद करण्यात आली असून पीक नुकसानीसाठी २ हजार कोटीची मदत देण्यात येणार आहे.