पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांचं पीकविमा कर्ज माफ! राज्य सरकारने काढला जीआर

महिला शेतकरी

महाविकास आघाडी सरकारने बुधवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.  

जहाजमध्ये अडकलेल्या दोन भारतीयांना कोरोनाची लागण

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णयावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला. यासंदर्भात जीआर देखील जारी करण्यात आला आहे. 

शिवजयंतीपासून कॉलेजचं कामकाज राष्ट्रगीतानंतरच सुरु होईल

मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होते. कोल्हापूर  सातारा, सांगली याठिकाणी पुराचा मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यातील तब्बल २ लाख १ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती. ज्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला त्यांना सरकारने दिलासा दिला आहे.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: state government announcement loan waiver farmer due to heavy rain flood damage in maharashtra