पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील 52 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलीस

राज्यातील वेगवेगळ्या भागात पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या 52 पोलीस अधिक्षक आणि पोलीस उप आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी गृह विभागाने पोलीस अधिक्षक आणि पोलीस उप आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती ही तात्पुरती स्वरुपाची आहे. 

NIA चे अधिकार वाढविणारे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर

यामध्ये नवी मुंबई गुन्हे शाळेचे पोलीस उप आयुक्त तुषार दोषी यांची बदली मरोळ येथील प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आली आहे. तर मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सोमनाथ घार्गे यांची बदली बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त पदावर केली आहे. गुप्तवार्ता कक्ष दहशतवादी विरोध पथक मुंबईचे पोलीस अधिक्षक मोहन दहिकर यांची बदली पोलीस उप आयुक्त बृहन्मुंबई पदी केली आहे. फोर्स वन, अर्बन काऊन्टर प्रशिक्षण संस्था मुंबईचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांची बदली पोलीस उप आयुक्त ठाणे शहर पदी करण्यात आली आहे. राज्या पोलीस नियंत्रण कक्ष आणि सहायक विशेष पोलीस महानिरिक्षक मुंभबईचे पोलीस अधिक्षक विजय खरात यांची बदली नाशिक येथे पोलीस उप आयुक्त पदी केली आहे. 

जनरलने दिलेली जबाबदारी सैनिक कसा काय नाकारू शकतो?