पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगबुडी नदीचे पाणी ओसरले; पुलावरुन पुन्हा वाहतूक सुरु

जगबुडी पूल

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढली. पूराचे पाणी जगबुडी पुलावर आल्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुलवारुन पाणी वाहत असल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पुराचे पाणी हळूहळू ओसरु लागल्यामुळे पुरावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 

स्टार्क टॉपर! रोहितला 'ओव्हर टेक' करण्याची रुट-विल्मम्सनकडे 

खेडमध्ये तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी नदी पुलावर आल्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुलावरुन वाहतूक होऊ नये यासाठी पुलाजवळ सुरक्षारक्षक आणि पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र हळू-हळू पुलावरील पाणी ओसरु लागल्यामुळे आणि पुलावरील वाहतूक ९ वाजता पुन्हा सुरु करण्यात आली. 

गेल्या चार वर्षांत घर घेणे अधिकच न परवडणारे, रिझर्व्ह बँकेचा अहवाल

गेल्या काही दिवसापासून खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडमधील जगबुडी नदीला त्यामुळे पूर आला होता. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी रात्री देखील नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आणि पुलाचे पाणी पूलावर आल्यामुळे वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला होता. दरम्यान, चिपळूनमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने महामार्गावरुन जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.  

मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट