पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेजसनंतर आता जनशताब्दीमध्येही शिळे अन्न, प्रवाशाची तक्रार

प्रातिनिधिक छायाचित्र

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला शिळे अन्न दिल्याची घटना ताजी असताना आता जनशताब्दीमधल्या महिला प्रवाशानं  शिळे अन्न दिल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी  आयआरसीटीसीनं ठेकेदारास नोटीस बजावून १ लाखांचा दंडही बजावला आहे.  

CAA विरोधात केरळ सरकार आता सुप्रीम कोर्टात

ठाण्याच्या रहिवाशी असलेल्या मधुमिता बाळ यांनी ११ जानेवारीला रेल मदत अॅपवरून तक्रार केली आहे. मधुमिता यांनी ब्रेड कटलेट ऑर्डर केले होते मात्र त्यावर बुरशी चढली होती. मधुमिता यांनी तात्काळ ही बाब विक्रेत्याच्या निदर्शनास आणून दिली. विक्रेत्याकडे मधुमिता यांनी तक्रार केल्यानंतर विक्रेत्यानं पैसे परत केलं असं मधुमिता म्हणाल्या. 

पुण्यात प्लास्टिकची अंडी दाखवा १००० रुपये मिळवा

रेल्वेकडून पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मधुमिता यांच्या तक्रारीनंतर आयआरसीटीसीनं ठेकेदारास १ लाखांचा दंड बजावला आहे.  शिळे अन्न दिल्याची ही महिन्याभरातील तिसरी घटना आहे. यापूर्वी सीएसएमटी ते करमालीदरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला शिळे पदार्थ देण्यात आले होते.