पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एसटी कर्मचाऱ्यांचा २५ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

एसटी बस

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचारी राज्यभर आंदोलन करणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहे. 

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करावा, दिवाळीनिमित्त आगाऊ पगार बोनस म्हणून द्यावा या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप न करता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एसटी कामगार संघटनेने सांगितले आहे. 

सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सीतारामन

कामगार कराराच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने जाहीर केलेला ३ टक्के महागाई भत्ता जुलै २०१९ च्या वेतनापासून लागू करण्याची मागणी पूर्ण करावी. राज्य सरकारच्या ३ व ४ कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना सुध्दा १२ हजार ५०० आगाऊ पगार दिवाळीनिमित्त बोनस म्हणून द्यावी अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार