पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज; २२०० जादा बसेस सोडणार

बदली झालेले पोलीस अधिकारी

अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्ववासाठी सगळ्यांची आवडती लालपरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव म्हटले की डोळ्यासमोर लगेच कोकण येते. गणेशोत्सव काळामध्ये मुंबईसह उपनगरामध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळामध्ये गणेशभक्तांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी एसटी महामंडळाने तब्बल २२०० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

ICC 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या आणि मागणी लक्षात घेता २२०० जादा बसेस मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. गणेशोत्सव काळामध्ये म्हणजे  २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहेत. येत्या २७ जुलैपासून या बसेससाठी संगणकीय आरक्षण करता येणार आहे. विशेष म्हणजे, परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तर २० जुलैपासून ग्रुप बुकिंग केले जाणार आहे. संबंधित लोकांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. 

बाबरी मशीद प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या-सर्वोच्च न्यायालय

मुंबई आणि उपनगरातील १४ बस स्थानकावरुन जादा बसेस सुटणार आहे. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत या बस स्थानकावर आणि थांब्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्माचारी अहोरात्र काम करणार आहेत. त्यानंतर कोकणातून परतीच्या प्रवासा दरम्यान देखील स्थानिक बसस्थानकावरुन जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. रस्त्यामध्ये बस खराब होऊ नये यासाठी देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी कोकणातील महामार्गावर ठिक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. 

सोनभद्र गोळीबार प्रकरण: प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात