पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी तीन आरोपींना एसआयटीने घेतले ताब्यात

गोविंद पानसरे

ज्येष्ठ विचारवंत, काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने तीन आरोपींना मुंबई आणि पुण्यातून ताब्यात घेतले. विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरुंगामधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना शुक्रवारी कोल्हापूरमधील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, न्यायालयाकडे त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. 

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने आतापर्यंत ८ संशयित आरोपीची चौकशी केली आहे. या प्रकरणी अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे, अमित डेगवेकर यांना ताब्यात घेऊन विशेष तपास पथकाने त्यांची चौकशी केली आहे. या प्रकरणात तपास पथकाने न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रामध्ये समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्या नावाचा उल्लेख आहे. 

कोल्हापूरमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेले असताना गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारांदरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Special Investigation Team investigating Govind Pansare murder case has taken the three accused in custody