पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच राज्यातील कर्करुग्णांवर एकसमान उपचार, आयुषमान भारत योजनेद्वारे सुविधा

आयुषमान भारत योजना

केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेमध्ये नोंदणी केलेल्या राज्यातील कर्करुग्णांना एकसमान वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाने आराखडा (प्लॅन) तयार केला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ही माहिती 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिली.

२२ % रुग्णांचं उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष

ते म्हणाले, आयुषमान भारत योजनेमध्ये नोंदणीकृत जी रुग्णालये आहेत. त्यांच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. लवकरच हे सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल. त्यानंतर या योजनेमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांसाठी निदान करण्याच्या, उपचार करण्याच्या पद्धती सॉफ्टवेअरमध्ये दिल्या जातील. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या उपचार पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. साधारणपणे असे दिसते की कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी जुन्या पद्धतींचा वापर केला जातो. ज्यामध्ये शस्त्रक्रिया असतील, रेडिओथेरपी असेल किंवा केमोथेरपी असेल. यासाठी कोणतीही निश्चित उपचार पद्धती ठरलेली नव्हती. 

टाटा मेमोरियल रुग्णालयातील डॉक्टरांनी जी उपचार पद्धती निश्चित केली आहे. ती अद्ययावत आहे. त्यामुळे रुग्णांना फायदाच होणार आहे. संपूर्ण राज्यात रुग्णांना एकसारखेच उपचार मिळावे, असा आमचा हेतू आहे, असे सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

दिवसातून सहा कप पेक्षाही अधिक कॉफी पिणे आरोग्यास घातक

आयुषमान भारत योजने अंतर्गत राज्यात सर्वाधिक 'मेडिकल ऑन्कोलॉजी' या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. आतापर्यंत ५.५८ लाख रुग्णांनी या उपचार पद्धतीचा वापर केला आहे. या उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपी, हार्मोनल थेरपी यांचा समावेश होतो. टाटा मेमोरियल रुग्णालयातील रेडिएशन उपचार पद्धती विभागातील सरबानी घोष लष्कर यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात आयुषमान भारत योजने अंतर्गत एकूण २.२२ कोटी कुटुंबांना संरक्षण मिळाले आहे. त्यापैकी २३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.