पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नव्या सरकारसाठी सोनियाजींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे'

 आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधींची भेट घेतली

नव्या सरकारसाठी सोनियाजींचे आशीर्वाद हवे, असं ठाकरे कुटुंबियातील पहिले आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवाजीपार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी कोणकोण उपस्थित राहणार  याचं कुतूहल राजकीय वर्तुळात आहे.  आदित्य ठाकरे यांनी २७ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील १० जनपथ येथील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि शपथविधी सोहळ्याचं खास निमंत्रण त्यांना दिले. 

अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत राष्ट्रवादीचे मौन

त्याचप्रमाणे माजी पंतप्रधनात डॉ. मनमोहन सिंग यांचीही भेट घेत आदित्य ठाकरेंनी त्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. नव्या सरकारसाठी आम्हाला सोनियाजींचे आशीर्वाद  हवे आहेत. आम्ही सोनिया आणि मनमोहन सिंग यांची भेट घेतली\ त्यांचे मार्गदर्शन  आणि शुभेच्छा आम्हाला महत्त्वाच्या आहेत, असं आदित्य ठाकरे एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

उपमुख्यमंत्री एकच आणि तोही राष्ट्रवादीचाच, नाव गुलदस्त्यात

 सोनिया गांधी यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाली असून त्या शपथविधी सोहळ्याला येतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी वर्तवला आहे. शिवाजी पार्क येथे गुरुवारी सांयकाळी महाविकास आघाडीचा शपथविधी पार पडणार आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे मंत्रिपदची शपथ घेतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोघांचा शपथविधी पार पडेल. 

महाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं?