पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण, राज्यात या वेळेत दिसणार ग्रहण

(AP file)

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, २६ डिसेंबरला दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं. भारतात सकाळी ७.५९ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. तर सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्य चंद्रामुळे झाकोळलेला दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. 

आजचे राशिभविष्य | बुधवार | २५ डिसेंबर २०१९

कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून देखील हे ग्रहण दिसणार आहे. यादिवशी 'रिंग ऑफ फायर' पाहण्याचा उद्भूत योग येणार आहे. पु़ढील वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहणामुळे ओदीशामध्येही शाळा, महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर आज चार तासांचा मेगा ब्लॉक, केडीएमटीची विशेष बस सेवा