पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी दिली १५ क्विंटल ज्वारी

डिकसळ येथील शेतकऱ्यांनी सुमारे १५ क्विंटल ज्वारी शासनास दान दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटग्रस्त उपाययोजना अंतर्गत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मोहोळ तालुक्यातील (जि. सोलापूर) बहुभूधारक शेतकऱ्यांना ज्वारी दान करण्याचे आवाहन केले होते.

कोरोनामुक्त होणारं गोवा पहिलं राज्य, सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

या आवाहनास प्रतिसाद देत डिकसळ येथील शेतकऱ्यांनी सुमारे १५ क्विंटल ज्वारी शासनास दान दिली आहे. गावातील विठ्ठल मंदिरात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे ती सुपुर्द करण्यात आली. लॉकडाऊनमुळे सर्व परिस्थिति जागच्या जागेवर थांबली. परराज्यातील कामगार, हातावर पोट असलेले नागरिक यांची उपासमार होवू नये म्हणून शासन त्यांची खाण्यापिण्याची सोय करत आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कोरोना संकटग्रस्तासाठी कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्याकामी ग्रामस्तरावर गठित करण्यात आलेल्या ग्राम स्तरीय समिती मार्फत गावातील इच्छुक बहुभूधारक शेतकऱ्यांना ज्वारी दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

यू-टर्न !, ई-कॉमर्स कंपन्यांकडून फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच विक्री

कोरोना विषाणू संचारबंदीचा सर्वांत जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला आहे, त्याने कष्टाने पिकविलेले पीक मातीमोल होत आहे. मात्र या कठीण काळातही जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजास स्वतःच्या भाकरीपेक्षा कोरोना संकटग्रस्तांची भूक महत्वाची वाटत आहे. हेच ज्वारी दान मदतीवरुन अधोरेखित होते.