पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींचा जातीचा दाखला रद्द

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला आहे.मागील आठवड्यात यावर अंतिम सुनावणी झाली होती. डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने सांगितले आहे. दरम्यान, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी जात पडताळणी समितीने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येते.

थुंकी लावून पानं पलटू नका, कर्मचाऱ्यांना आदेश

जयसिद्धेश्वर महाराज यांनी मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा या राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. १५ फेब्रुवारी रोजीच यावर सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला.

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

जात पडताळणी समितीला जयसिद्धेश्वर महास्वामींनी जोडलेले कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्याने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.