पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निजामुद्दीनहून परतलेल्या सोलापूरच्या ११ जणांसह ३१ संशयित निगेटिव्ह

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीनुसार ११ जणांना शोधून रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित ६ जण परराज्या

निजामुद्दीन येथील तबलिबी-ए-जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १७ पैकी ११ तर याच कार्यक्रमासाठी गेलेल्या इतर १४ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना पोलिसांनी शोधून काढत शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. सर्व ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

स्वस्तात व्हेंटिलेटर, पुण्यातील तरुण इंजिनिअर्सचा कौतुकास्पद प्रयत्न

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीनुसार ११ जणांना शोधून रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित ६ जण परराज्यातील आहेत. यामध्ये दिल्ली व ठाणे येथील प्रत्येकी दोन तर निझामगड व पुणे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी माध्यमांना सांगितले. 

एकाच दिवशी ४५ परिसर सील, आतापर्यंत मुंबईत १९१ ठिकाणं no-go zone मध्ये

दरम्यान, १० राज्यांतून निजामुद्दीनला गेलेल्या ३ हजारहून अधिक लोक सापडले आहेत. यात बहुतांश जणांना क्वारंटाइन करण्यात आले. उत्तर प्रदेशात ५६९ लोक सापडले. यात २४ परदेशी आहेत. राजस्थानात ५३८, कर्नाटकात ३४२ लोक मरकजला गेले होते. यातील १५० जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले. मरकजमधील मलेशियाचे ५० लोकही क्वॉरंटाइन आहेत. हिमाचलमध्ये १६७ व उत्तराखंडमध्ये १७३ लोक क्वारंटाइन आहेत. हरियाणात ७२ विदेशींसह ५०३ लोक सापडले. पश्चिम बंगालमध्ये ७१ व जम्मूमध्ये हैदराबादच्या ९ लोकांसह १० जणांना क्वरंटाइन करण्यात आले आहे.

'मरकज'ची पुनरावृत्ती टाळा, राज्यात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको : CM

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:solapurs 31 person who participated nizamuddin markaz identified negative coronavirus covid 19