पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्कलकोट येथे शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

अक्कलकोट तालुक्यातील रूद्धेवाडी येथील शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. संग्राम देविदास चव्हाण (वय १४, रा. दुधनी, गांधीनगर तांडा, जि.सोलापूर) व सचिन अंबिराया हुली (वय १४, रा. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे दोन मृत शाळकरी मुलांची नावे आहेत.

शरद पवार-सोनिया गांधी यांची भेट सोमवारपर्यंत लांबणीवर

मृत संग्राम हा दुधनीत राहायला होता. रूद्धेवाडी येथील मातोश्री लक्ष्मीबाई प्रशालेत तो इयत्ता आठवीच्या वर्गात शिकायला होता. सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो शाळेत गेला. मात्र सायंकाळी ६ वाजले तरी तो घरी न आल्याने नातेवाईकांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता संग्राम व त्याचा मित्र सचिन हे सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत शाळेतच होते. साडेचारनंतर ते दोघे शौचास जातो म्हणून निघून गेले, असे सहकारी विद्यार्थ्यांनी सांगितले. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर ते सापडले नसल्याने नातेवाइकांनी दक्षिण पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संग्राम व सचिन यांचे मृतदेह मौजे रूद्धेवाडी येथील शेततळ्यात पाण्यावर तरंगत असल्याचे समजले.

शबरीमला मंदिर खुले, दर्शनाला जाणाऱ्या १० महिलांना रोखले