पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

घटनास्थळाचे छायाचित्र

मुंबई - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील काशीळ गावाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत प्रवासी सौदागर कुटुंबातील आहेत.

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. गाडी वेगात असतानाच चालकाचा ताबा सुटल्याने ती वेगाने झाडावर जाऊन आदळली. यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सौदागर कुटुंबीय हे धारवाडचे रहिवासी होते. ते आपल्या गावी परतताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.