पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नगरसेवक पद रद्द झालेला छिंदम म्हणतो, 'माझा कोणावरही रोष नाही'

श्रीपाद छिंदम

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल अहमदनगरचे भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद सरकारने रद्द केले. सरकारच्या या निर्णयावर श्रीपाद छिंदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारच्या या निर्णयाविरोधात माझा कोणावरही रोष नाही, असे छिंदमने सांगितले.  

 

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर श्रीपाद छिंदम यांनी सांगितले की, 'अहमदनगर महापालिकेकडून मला आताच आदेशाची प्रत मिळाली. तो आदेश मी वाचला. तो योग्य आहे की अयोग्य? यावर इतक्यात काही बोलणे योग्य होणार नाही. मंत्र्यांसमोर जे कामकाज आले, ते त्यांनी पूर्ण केले. त्याविरोधात याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. तसंच, या निर्णयाविरोधात माझा कोणावरही रोष नाही.'

एवढं खोटं का बोलता?; गृहमंत्र्यांचा काँग्रेस, ममता बॅनर्जींना सवाल

अहमदनगरचे अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना शुक्रवारी सरकारने मोठा दणका दिला. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द सरकारने रद्द केले. महापुरुषाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई केली. श्रीपाद छिंदमने अहमदनगरच्या उपमहापौर पदावर असताना फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारला होता. 

निर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची याचिका