पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीपाद छिंदमला सरकारचा दणका; नगरसेवक पद केले रद्द

श्रीपाद छिंदम

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते?; शिवसेनेचा सवाल

श्रीपाद छिंदमने अहमदनगरच्या उपमहापौर पदावर असताना फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारला होता. छिंदम यांच्याविरोधात अहमदनगरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर श्रीपाद छिंदमकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेत भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. 

भाजप नेते नरेंद्र मेहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा

महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचे नगरसेवक पद देखील रद्द करण्यात आले होते. मात्र २०१८ च्या अहमदनगर महापालिका निवडणूक छिंदमने अपक्ष लढवली होती. या निवडणुकीत छिंदम प्रभाग ९ (क) मधून निवडून आला होता. आता सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. 

गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या चाकूने भोकसून; शवविच्छेदन अहवालात खुलासा