पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधीस्थळाचे वेबसाइटवरुन थेट प्रसारण

श्री गोंदवलेकर महाराज

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व मंदिरे सर्वसामान्यांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरात बसून राहावे लागत आहे. इच्छा असूनही भाविकांना आपल्या देवदेवतांचे दर्शन घेता येईना. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घरबसल्या भाविकांना व्हावा यासाठी श्री गोंदवलेकर महाराज संस्थानने थेट दर्शनाची सोय केली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून राज्य सरकारला एक कोटींची मदत

श्री गोंदवलेकर महाराज संस्थानच्या https://shrigondavalekarmaharaj.org/maharaj_home/home या वेबसाइटवर महाराजांच्या भक्तांसाठी थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या वेबसाइटवर पहाटे ४.४५ ते ६.३०, दुपारी ११.३० ते १२.०० आणि सायंकाळी ८ ते ८.३० या काळात वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास भाविकांना थेट दर्शन घेता येईल. 

भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन, श्री गोंदवलेकर महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 

लॉकडाऊनमधील 'माणुसकी', पाहा फोटो