पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालेगावमध्ये महिलेची गोळ्या झाडून हत्या

गोळीबार

मालेगाव शहरात अज्ञात व्यक्तीने भरदिवसा गोळ्या झाडून महिलेची हत्या केली. ही घटना मालेगाव शहरातील संविधाननगरमध्ये घडली. ज्योती भटू डोंगरे (४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन रिकामे काडतूस जप्त केले आहेत.

कर्नाटक पोलिसांची मुजोरी; मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना ताब्यात घेऊन सुटका

जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक असलेले भटू डोंगरे पत्नी व दोन मुलींसह संविधाननगरमध्ये राहतात. गुरुवारी दुपारी डोंगरे कामानिमित्त बँकेत गेले होते. दोन्ही मुली जवळच रहाणाऱ्या मावशीच्या घरी गेले होते. तर ज्योती डोंगरे या घरात एकट्याच होत्या. 

संजय राऊतांना पदावरुन दूर करा; संभाजी भिडेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी

त्या घराच्या दरवाजाजवळ उभ्या असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी छातीत घुसल्याने ज्योती यांचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला.

नागपूरः चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इन पार्टनर महिलेचा खून